हल्ली ना माझी फार म्हणजे फारच पंचाईत होते ....
काय कराव आणि कसं वागावं हेच मला कळत नाहीये असं वाटायला लागतं ...
आता हेच बघा ना, परवाची गोष्ट ... ऑफिस मध्ये नवीन कलिग ने जॉईन केलं , ती मुलगी इन्फी मधून आलेली .... आल्या आल्या मला विचारते , तुला गैजेट्स नाही का आवडत .... मी सरळ नाही म्हणालो तर माझ्याकडे "कोई मिल गया" मधल्या जादू कडे बघावं तसं बघत नाक उडवून निघून गेली .... काय चुकलं माझं ??
आमच्या सोसायटी मधल्या (बिल्डींग हल्ली खूपच डाऊन मार्केट समजतात म्हणून सोसायटी ...) एका लहान मुलीला विचारलं कि तु शाळेत जाते का ... तर ती मला म्हणते कि मी शाळेत जायला काय मोठी आहे का ?? मी प्ले ग्रुप ला जाते .... च्यामारी, मराठी मध्ये शाळा म्हणालो तर मी गावंढळ का ??
खरं सांगू का ?? मला नाही आवडत रिमिक्स गाणी ऐकायला किंवा चेतन भगत ची पुस्तक वाचायला,,म्हणजे मला ते बिल्कूलच जमत नाही असा काही नाही .... कधी मूड लागला तर वाचतो पण ....
मी अस सांगितलं ना कि मला नाही आवडत हे सगळ, कि समोरच्या माणसाची नजर लगेच तिरस्कार का काय म्हणतात ते, त्याने भरून जाते ... (मुलगी असेल तर १० पट जास्तच)... मग होते पंचाईत ...
खरं सांगाव तर आपण बावळट ठरतो आणि खोटं बोलायची सोयच नाही ....
असाच मुंबई वरून एकदा येत होतो, समोर च्या सीट वर एक आजोबा बसले होते, बराच वेळ त्यांची चुळबुळ चालली होती ... बर आपण काही बोलाव तर त्यांची नात त्यांच्या बरोबर होती .... असेल १५-१६ वर्षांची ( दिसायला पण बरी होती)... कानात इयरफोन लाऊन गाणी ऐकत होती ... आजोबा तसेच, अस्वस्थ .... शेवटी राहवेना म्हणून आजोबांना विचारलं "काही होतंय का तुम्हाला ?? काही हव आहे का ?"
इतक बोलायचा अवकाश ते घडाघडा बोलायला लागले ... किती साधं होतं ते बोलणं , पण ऐकणारं कोणीतरी असावं इतकंच हवं होत त्यांना .... नात शेजारी असताना हि वेळ का येते ?? मी त्यांच्याशी बोलायला लागलो तर त्या मुलीने खूप विचित्र नजरेनी बघितलं .... थोडा वेळ गप्पा मारून मी पण मग शांत बसलो ....
पण आत कुठे तरी काहीतरी हललं होतं हे मात्र खरं ....
इथे पण माझंच काहीतरी चुकलं का??
मला तर नाही वाटत तसं .... मग माझीच अशी पंचाईत का होते ?? का तुमचं पण असंच होतं ??
तुम्ही द्याल का या प्रश्नाच उत्तर ?? टाळू शकता का तुम्ही अशी पंचाईत??