Wednesday, April 17, 2019

विठ्ठला अजब तुझे सरकार ...



काल संध्याकाळी माझ्या ५ वर्षांच्या मुली बरोबर (ओवी ) खेळत होतो ... तेव्हा आमच्यात झालेले संभाषण ...
ओवी : बाबा आज मी तुला विठ्ठल आणि पुंडलिकाची गोष्ट सांगते ... 
मी     : चालेल ...
ओवी : एकदा ना विठ्ठल असतो ना त्याचा भक्त पुंडलिक... दोघे जण देवळात असतात ... पुंडलिकाने विठ्ठलाच्या मूर्तीला जेवणाचं ताट ठेऊन गोल गोल पाणी फिरवलेल असत...
मी     : अगं त्याला नैवेद्य म्हणतात...
ओवी : हां... तर पुंडलिकाने विठ्ठलाच्या मूर्तीला नैवेद्य दिलेला असतो...
मी     : विठ्ठलाला नैवेद्य दाखवलेला असतो असा म्हणायचं ...
ओवी : नाही रे, मूर्ती ला...
मी     : अगं ... मूर्ती आणि विठ्ठल एकच ना
ओवी : नाही...  मूर्ती काळी असते , विठ्ठल पांढरा असतो...
मी     : नाही ... विठ्ठल सावळा असतो... म्हणजेच काळा ...
ओवी : नाही .. विठ्ठल पांढरा असतो ... TV  मध्ये बघितलंय मी...
मी     : तू ते गाणं ऐकलंयस  ना... देव माझा विठू सावळा ... मग ...
ओवी : (२ मिनिटं  विचार करून )... विठ्ठल पांढराच असतो पण ते गाणं विठ्ठलाच्या मूर्ती साठी लिहिलंय ना...
मी     : (स्पीचलेस ... हाताची घडी तोंडावर बोट )

TV वर मालिका दाखवणाऱ्या लोकांना कोणीतरी सांगा कि ह्या गोरेपणाच्या वेडातून निदान देवाला आणि मुलांना तरी सोडा म्हणावं ...

No comments:

Post a Comment